जेएनएन, मुंबई, Minister Manikrao Kokate Online Rummy : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर 'सामना' अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. कृषीमंत्री कोकाटे हे विधिमंडळात असताना मोबाईलवर ‘रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर कोकाटेंवर टीकेची झोड उठली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्येचे भीषण चित्र असताना कृषीमंत्री रमी खेळत असल्याची टीका विरोधीपक्षांकडून केली जात आहे.

सामनाचा अग्रलेख !

राज्यातील शेतकरी बांधावर गळफास लावत आहेत आणि कृषीमंत्री विधिमंडळात मोबाईलवर ‘रमी’ खेळत आहेत. एवढं करूनही 'काही पाप केलं नाही' असं उद्दामपणे सांगतात. महाराष्ट्राला अनेक दिग्गज कृषीमंत्री लाभले, मात्र आताचे 'माणिक' त्या परंपरेत कुठेच बसत नाहीत. अग्रलेखात 'रत्नां'च्या खाणीत भर म्हणून कोकाटेंचा उल्लेख "मोबाईलवर रमी खेळणारा माणिक" असा केला आहे.

रोहित पवारांचा व्हिडिओ व आरोप!

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटर (X) वरून कृषीमंत्री कोकाटेंचा व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप केले. शेतकरी आत्महत्या करत असताना, मंत्री सभागृहात रमी खेळत आहेत. हे दुःखद आणि लाजिरवाणं आहे.

राजीनामाची मागणी !

    शेतकऱ्यांनी मरावं आणि कृषीमंत्र्यांनी जुगार खेळावा? असा संतप्त सवाल काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी उपस्थित करत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.