एजन्सी, पालघर: मुंबई महानगर प्रदेशात एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन 17 वर्षीय मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पालघर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली.

इन्स्टाग्रामवर झाली होती मैत्री

पीडितेची आरोपींपैकी एकासोबत इन्स्टाग्रामद्वारे मैत्री झाली. 11 जुलै रोजी, त्याने एका तातडीच्या विषयावर चर्चा करण्याच्या बहाण्याने तिला स्थानिक चाळीत बोलावले. त्याने आणि त्याच्या साथीदाराने कथितरित्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला, त्या कृत्याचे चित्रीकरण केले आणि ही घटना उघड केल्यास तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.

गुन्हा दाखल

पीडितेच्या काकांनी तो व्हिडिओ ऑनलाइन पाहिल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी हा गुन्हा उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.