एजन्सी, मुंबई. Eknath Khadse meet Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

सागर बंगल्यावर घेतली भेट

पीटीआयच्या मते, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, मंगळवारी रात्री दक्षिण मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगल्यावर ही भेट झाली आहे.

‘ही राजकीय बैठक नव्हती’

"खडसे काही वैयक्तिक कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले. ही राजकीय बैठक नव्हती," असे सूत्रांनी सांगितलं आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 

    भाजपात चार दशकांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या Eknath Khadse यांनी 2016 मध्ये कथीत भोसरी येथील जमीन खरेदी घोटाळ्यानंतर मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी तेव्हाच्या एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर खडसे हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत.

    खडसेंचा परतीचा प्रयत्न

    मागील वर्षी झालेला लोकसभा निवडणुकीत खडसे यांनी भाजपामध्ये परतण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही.  खडसे यांची सून असलेल्या भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे ह्या सध्या केंद्रात युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री आहेत.