जेएनए, मुंबई. Anna Bansode Deputy Speaker: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी आज बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अण्णा बनसोडे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा विधानसभामध्ये केली आहे.

उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे

नरहरी झिरवळ यांना मंत्री पदी वर्णी लागल्यानंतर अजित पवार गटाकडून बनसोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बनसोडे यांची आज निवड बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष पद घेतल्याने विधानसभा उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आले आहे.

विरोधी पक्षाचा अर्जच नाही

महायुतीकडे उपाध्यक्ष निवड करण्यासाठी पूर्ण बहुमत असल्याने अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला नाही, यामुळे अण्णा बनसोडे यांची निवड बिनविरोध झाली आहे.

    राजकीय कारकिर्द

    पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची राजकीय कारकिर्द 1997 साली सुरु झाली. सलग 2 वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष पद भूषविल्यानंतर 2009 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. पुढे 2019 तसेच 2024 साली सलग आमदार राहिले. आता विधानसभेच्या उपाध्यक्षपदी झालेली त्यांची बिनविरोध निवड हा त्यांच्या आजवरच्या कामाचा सन्मान आहे.