मुंबई. नवी मुंबईतून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील कामोठे येथे एका स्कूल बस चालकाने 3 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. कुटूंबियांच्या तक्रारीनंतर आरोपी बस चालकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कूल सुटल्यानंतर अन्य मुलांना आपआपल्या घरात उतरल्यानंतर 3 वर्षीय मुलगी व्हॅनमध्ये एकटीच राहिली होती. आरोपीने या एकांताचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.

पोट दुखीच्या तक्रारीनंतर झाला खुलासा -

या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने आजीला सांगितले की, तिच्या पोटात दुखत आहे. तिने आजीला सांगितले की, बसमध्ये ड्रायव्हरने तिला त्रास दिला होता. 

त्यानंतर मुलीच्या आजीने याबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार केली व पोलिसांशी संपर्क साधला. मुलीच्या मेडिकल टेस्टमध्येही लैंगिक शोषणाची पुष्टी झाली. त्यानंतर पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शाळा कर्मचाऱ्यांचेही घेतले जाणार जबाब -

    लैंगिक शोषणाच्या आरोपात पोलिसांनी आरोपीने बस चालकाला अटक केली आहे. आरोपीला गुरुवारी पनवेलच्या एका न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवले जातील.

    पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. त्यामध्ये 12 वर्षाहून कमी वयाच्या मुलीवर बलात्काराशी संबंधित कलमे आणि लैंगिक शोषणापासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) अधिनियम यांचा समावेश आहे.

    बुधवारी दुपारची घटना -

    पोलिसांनी सांगितले की, मुलगी अन्य मुलांसोबत दररोज खासगी बसने शाळेला जात होती. बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चालकाने कामोठे येथे किंडरगार्टन आणि प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी बस तिकडे नेली. 

    अन्य मुलांना आपआपल्या घरी पोहोचवल्यानंतर तीन वर्षीय मुलगी चालकासोबत बसमध्ये एकटीच राहिली. याचा फायदा घेत बस चालकाने तिचे लैंगिक शोषण केले.