जेएनएन, नाशिक. Nashik Politics News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेसह (Nashik former MP Hemant Godse) काही माजी नगरसेवकांसह लवकरच भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे करणार भाजपात प्रवेश

गोडसे यांच्या भाजपमध्ये पक्ष प्रवेशने महायुतीच्या गोटातच अस्वस्थता पसरली आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली असून प्रवेशाची औपचारिक घोषणा येत्या काही दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे. गोडसेसोबत काही माजी नगरसेवकांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.

भाजपाला होणार मोठा फायदा

नाशिकमधील शिंदे सेनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकते. गोडसे यांच्या भाजपमध्ये प्रवेशने शिंदेची नाशिकमध्ये अडचण होऊ शकते. तर भाजपला नाशिक महापालिकेसह जिल्ह्यातील इतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा होऊ शकतो.