जेएनएन, मुंबई: Maharashtra Civic Polls 2026: राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. आता 16 जानेवारी रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल, ज्यामध्ये मुंबईतील 15 ठिकाणांचा समावेश आहे. अंतिम निकाल दुपारी 4 वाजेपर्यंत अपेक्षित आहेत.

Municipal Corporation Election 2026 Result: महापालिका निवडणूक निकाल

15 जानेवारी रोजी राज्यात होणाऱ्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचे नशिब इव्हीएममध्ये कैद झाले आहे. उद्या त्यांच्या निकाल लागणार आहे. 

एसईसीच्या आकडेवारीनुसार, एकूण 33,247 नामांकन दाखल झाले होते, त्यापैकी 24,771 अर्ज छाननीनंतर वैध आढळले. अंतिम मुदतीपर्यंत वैध आढळलेल्या उमेदवारांपैकी 8,840 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

या 29 महानगरपालिकांमधील 893 वॉर्डांमधील 2869 जागांसाठी निवडणुका होत आहेत. 227 जागा असलेल्या मुंबई वगळता, उर्वरित सर्व बहुसदस्यीय वॉर्ड आहेत.  

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2026: उमेदवारांची माहिती

    मुंबई–ठाण्यात संमिश्र प्रतिसाद, विदर्भातही मतदानात वाढ

    मुंबई, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरांमध्ये दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. सकाळी काही केंद्रांवर मतदारांची उपस्थिती कमी होती, मात्र दुपारनंतर तरुण, नोकरदार आणि महिला मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

    विदर्भातील नागपूर, अकोला येथेही मतदानात हळूहळू वाढ होत असून मराठवाड्यातील परभणी, जालना, नांदेड, अहिल्यानगर या भागांत तुलनेने चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कोल्हापूर 50.85% आणि परभणी (49.16% येथे मतदानाचा टक्का सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

    पोलीस बंदोबस्त कडेकोट, किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत! 

    राज्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी किरकोळ वाद, बाचाबाचीचे प्रकार समोर आले असले तरी एकूणच मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. प्रशासनाकडून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

    अ.क्र.महानगरपालिकेचे नावप्रभाग संख्यासदस्य संख्याअंतिम उमेदवारांची संख्या
    1बृहन्मुंबई2272271700
    2छत्रपती संभाजीनगर29115859
    3नवी मुंबई28111499
    4वसई-विरार29115547
    5कोल्हापूर2081327
    6कल्याण-डोंबिवली31122489
    7ठाणे33131656
    8उल्हासनगर2078432
    9नाशिक31122735
    10पुणे411651166
    11पिंपरी-चिंचवड32128692
    12सोलापूर26102564
    13अकोला2080469
    14अमरावती2287661
    15नागपूर38151993
    16चंद्रपूर1766451
    17लातूर1870359
    18परभणी1665411
    19भिवंडी-निजामपूर2390439
    20मालेगांव2184301
    21पनवेल2078255
    22मिरा-भाईंदर2495435
    23नांदेड-वाघाळा2081491
    24सांगली-मिरी-कुपवाड2078381
    25जळगांव1975333
    26धुळे1974320
    27अहिल्यानगर1768283
    28इचलकरंजी1665230
    29जालना1665453
    एकूण893286915931