जेएनएन, मुंबई. Mumbai Weather: मुंबईत उद्यापासून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने मुंबईत उष्ण आणि दमट हवामान राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच, दुपारी/संध्याकाळ हलक्या आणि विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
मुंबईत सध्या कुलाबा भागात 33.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबई सांताक्रुझ भागात 34.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या 23, 24 आणि 25 एप्रिल रोजी मुंबईतील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईत दिवसा उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर रात्री पावसाची शक्यता आहे.
राज्यातील गारपीटीची शक्यता
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे होण्याची दाट शक्यता आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
दक्षिण कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे होण्याची दाट शक्यता आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain, gusty winds with speed 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa and North Madhya Maharashtra. pic.twitter.com/BwZ2Hu97Ta
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 22, 2026
हेही वाचा - Vidoe: ‘मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतो, लोकांना त्रास…’ ‘त्या’ मुद्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
