जेएनएन, मुंबई. Temperature in Mumbai: राज्यात अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हाच्या पाऱ्यात घराबाहेर जाणे टाळावे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

मुंबईत पुढील पुढील 48 तासांसाठी अलर्ट

  • पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
  • तर मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 48 तासांसाठी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत 7, 8 आणि 9 मे रोजी येलो अलर्ट (Yellow Alert in Mumbai)

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण आणि दमट वातावरणाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईतील तापमान (Temperature in Mumbai)

मुंबई कुलाबा भागात 33.8 आणि मुंबई सांताक्रूझ भागात 33.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. 

    उष्णतेची लक्षणे

    अत्यधिक उष्णतेमुळे केवळ अस्वस्थता येत नाही, तर आरोग्याला गंभीर धोकाही निर्माण होतो. त्याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

    • शरीरात पाण्याची कमतरता
    • स्नायूमध्ये पेटके येणे
    • उष्माघात किंवा सनस्ट्रोक येऊ शकतो

    प्रतिबंधासाठी काय करावे आणि काय करू नये?

    जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणाला उष्माघाताची लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ पुढील उपाययोजना करा: 

    • बाधित व्यक्तीला ताबडतोब सावलीच्या किंवा थंड ठिकाणी हलवा.
    • पाणी किंवा ओआरएस द्रावण पिऊन शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवा.
    • अल्कोहोल, कॅफीन आणि वायूयुक्त शीतपेये टाळा.
    • चेहऱ्यावर ओला कपडा ठेवा आणि हवा खेळती राहण्यासाठी कपडे सैल घाला.

    हेही वाचा - पुणे पुन्हा हादरले; 9 वर्षांच्या नातीसोबत सख्खा आजोबाने केलं अत्यंत घृणास्पद कृत्य, 'किंकाळ्या ऐकून...'