जेएनएन, मुंबई. Mumbai News: राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत तुफान पावसाने चांगलाच झोपडले आहे. मान्सूनपूर्व मेट्रो कामांची पोलखोल झाली आहे. पावसाचा परिणाम मुंबई मेट्रोवरसुद्धा पाहायला मिळाला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात लोकल रेल्वे सह मेट्रो स्थानकांवर पाणी साचल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मुंबई मेट्रोकडून वरळीमधील मेट्रो स्थानकाच उद्घाटन झाले होते. तेच पहिल्या पावसात स्थानकवर पाणी घुसल्यानंतर मेट्रो कामाची फज्जा उडाली आहे. वरळी येथील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकावर पाणीसह चिखल घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. 

राज्य प्रशासनाचे अनेक दावे फेल झाले असून मेट्रो प्रशासन कडून सावरा-सावर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या संचालक व्यवस्थापक अश्विनी भिडे यांनी एक्स पोस्टवरुन स्पष्टीकरण दिले  आहे. मेट्रो प्रवाशी खुश आहेत. एक स्थानक बंद असला तरी मेट्रो सेवा सुरळीत सुरू, असा दावा भिडे यांनी केला आहे. 

काय म्हणाल्या अश्विनी भिडे

मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या संचालक व्यवस्थापक अश्विनी भिडे यांनी एक्स पोस्टवरुन स्पष्टीकरण देत म्हणाल्या की, मेट्रो सेवेवर पावसाचा फारसा परिणाम झाला नसून, काल दुपारपर्यंत 24 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. सतत पावसामुळे एसडब्ल्यूडी नाल्यातून अचानक पाणी येऊन आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या निर्माणधीन प्रवेश द्वारातून स्थानकात आले, असा दावा त्यांनी केला आहे. मेट्रो सेवेवर पावसाचा फारसा परिणाम झाला नाही. आरे ते वरळी मेट्रो मार्ग सुरळीत आहे. स्थानक बंद असतानाही 24 हजार प्रवासी सेवेवर खूश आहेत. एक स्थानक ठप्प होते, पण मुंबईकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

    वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मेट्रोच्या कामकाजवर टीका केली आहे. मेट्रो 3 ला अॅक्वालाईन का म्हटले जात होते हे आज कळले. संरक्षक भिंतीचं काम सुरु होते, असे मेट्रोचे म्हणणे आहे मग उद्घाटनाची घाई सरकारने का केली? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या खिशातले खड्डे भरले पण मुंबईतले खड्डे भरले नाहीत. स्वत:ला इन्फ्रामॅन म्हणवणारे आता कुठे गेले अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.