जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Update: भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.
मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अलर्ट (Heavy Rainfall Alert in Mumbai)
मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असं BMC ने आपल्या एक्स या समाजमाध्यमावर सांगितलं आहे. आज मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मुंबईच्या किनारी भागात समुद्राला भरती दुपारी 03:31 वाजता 4.21 मीटर येणार आहे. तर ओहोटी ही रात्री 09:41 वाजता 1.86 मीटर असणार आहे, असं पालिकेनं म्हटलं आहे.
🗓️ १६ जून २०२५
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 16, 2025
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती -
दुपारी ०३:३१ वाजता - ४.२१ मीटर
ओहोटी -
रात्री ०९:४१ वाजता - १.८६ मीटर
🌊 भरती -
मध्यरात्रीनंतर ०३:३१ वाजता - ३.४४ मीटर (उद्या १७ जून २०२५)
ओहोटी -
सकाळी ०९:१० वाजता - १.३३ मीटर…
या जिल्ह्यांला रेड अलर्ट
हवामान विभागाने आज कोकणात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्टही दिला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसानं कमबॅक केलं आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. आज हवामान खात्यानं अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंद्धुदुर्ग, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट या भागांचा समावेश आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्टराज्यात पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. शेतीसाठी पुरक असा पाऊस पडत आहे. आज हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक घाट, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.