एजन्सी, मुंबई: मुंबईत सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस (Heavy Rains in Mumbai) सुरूच राहिला, ज्यामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आणि वाहनांची गती मंदावली, असे वाहनचालकांनी सांगितले. आजही मुंबईत हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट (Red alert in Mumbai) दिला आहे.

अंधेरी सबवे पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे विविध भागातील रस्ते पाण्याखाली गेले. अंधेरी सबवे, लोखंडवाला कॉम्प्लेक्स सारख्या काही सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.  

अधिकारी आणि प्रवाशांच्या मते, महानगराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल गाड्या 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाच्या बस सेवांचे कोणतेही मार्ग वळवले गेले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  शनिवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. 

सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर सकाळी 9 वाजल्यापासून पावसाची तीव्रता आणखी वाढली, असे एका महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

    मुंबईत झालेला पाऊस

    सकाळी 9 वाजल्यापासून अवघ्या एका तासात बेट शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 37 मिमी, 39 मिमी आणि 29 मिमी सरासरी पाऊस पडला. एका तासाच्या कालावधीत पूर्व उपनगरातील चेंबूरमध्ये सर्वाधिक 65 मिमी पाऊस पडला, त्यानंतर शिवाजी नगरमध्ये 50 मिमी पाऊस पडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    सोमवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत, मुंबई शहरात सरासरी 54.58 मिमी पाऊस पडला, पूर्व उपनगरात 72.61 मिमी, तर पश्चिम उपनगरात 65.86 मिमी पाऊस पडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या काळात अनेक भागात 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला, असे त्यांनी सांगितले.

    राज्यातील या जिल्ह्यांत अलर्ट

    • रेड अलर्ट
      - ठाणे, मुंबई, रायगड, रत्तागिरी, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, 
    • ऑरेंज अलर्ट
      - सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, अमरावती, 
    • येलो अलर्ट
      - धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, अकोला,  भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

    हेही वाचा - Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! पुढील 3 ते 4 तासांत…; घराबाहेर पडू नका - मुंबई पोलिसांचे आवाहन