जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Update: संपूर्ण राज्यात धो-धो पाऊस पडत आहे. यामुळे राज्यातील तापमानमध्ये मोठी घट झाली आहे. मुंबई कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात चांगला पाऊस पडला आहे. कोकण सोडून राज्यातील शेतकऱ्यांची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यात पेरणी झाल्यानंतर पिकावर पाऊस ही चांगला पडत आहे. पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी मुळसधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  

राज्यात आजही पाऊस सुरूच आहे. सकाळपासूनच मुंबईत आणि कोकणमध्ये पाऊस पडत आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील तीन दिवस विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळांचा इशारा दिला हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला असून त्याचा प्रभाव राज्यातही दिसणार आहे अशी सूचना जारी केली आहे. 

कोकण भागात पेरणीला सुरुवात !

कोकणमध्ये अजूनही पेरणीला सुरुवात झाली नसून येत्या दोन तीन दिवसात धान पेरणीला सुरुवात करणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याचा स्तर शेतात वाढत असून अजून  दोन तीन दिवसानंतर पेरणीला सुरुवात करावी अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत पुढीत तीन तासांत मुसळधार पाऊस

    भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन बीएमसीने केलं आहे.