एजन्सी, मुंबई: मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने 5 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 18,818 ई-चलाण जारी केले आणि एकूण 1.92 कोटी रुपयांचा दंड ठोठावला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली.
वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल सर्वाधिक 3,727 ई-चलाण जारी करण्यात आले, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
या मुळे झाली कारवाई
इतर उल्लंघनांमध्ये धोकादायकपणे वाहन चालवणे आणि वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट (तिघे जण) प्रवास करणे आणि नो-एंट्री झोनमध्ये प्रवेश करणे यांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
कारवाई सुरुच राहणार
"सीसीटीव्ही फुटेजद्वारे ओळखल्या गेलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ई-चलाण पाठवले जात आहेत," असे ते म्हणाले.
