जेएनएन, मुंबई. Mumbai Pakistani Nationals: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्याचे आदेश दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतून 17 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली असून त्यांना एक्सिट परमिट देण्यात आले आहे.

मुंबई सह संपूर्ण राज्यात पाकिस्तानी नागरिक शोधण्याचा काम  युद्धस्तरावर सुरू असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. हे 17 नागरिक पर्यटक व्हिसावर आले होते त्यांना परत पाठविण्यासाठी एक्सिट परमिट देण्यात आले असून आज संध्याकाळ पर्यंत भारत  सोडावे लागणार आहे. महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आणखी काही यादीचा शोध पोलिसकडून घेतला जात आहे.

राज्यात पाकिस्तानी नागरिकला बाहेर पाठविण्याचा काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई केली जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

पाकिस्तान मधील कोणताही नागरिक भारतात राहू नये यासाठी सर्च ऑपरेशन केंद्र सरकारच्या आदेशाने महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे . महाराष्ट्र सरकारने मुंबईसह पुणे नाशिक,औरंगाबाद,नागपूर या प्रमुख शहरात सर्च ऑपरेशन सुरू केला आहे अशी माहिती मिळाली आहे.

भारताची सुरक्षा मजबूत करणे आणि दहशतवादाला आळा घालणे आहे. देशातील निरपराध नागरिकांवर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आहे. पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.