मुंबई. मुंबईत पंतप्रधान मोदींच्या रॅलीआधी पोलिसांनी बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या एका संशयिताकडे पीएमओचे बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या साथीदाराकडून एक बंदूक जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीीनुसार, पकडण्यात आलेला 24 वर्षीय तरुण पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सांगून परिसरात शिरण्याचा प्रयत्न करत होता. बंदूकीसह ताब्यात घेण्यात आलेला संदिग्ध बॉडीगार्डच्या रुपात त्याच्या सोबत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी एनएमएसीसी (NMACC) सेंटरमधून रोहन पारेख नावाच्या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. रोहन हा एनएमएसीसी परिसरात वावरत होता सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी त्याची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. सुरक्षा यंत्रणांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांना समजले की, रोहन पारेख हा एकटा नाही तर स्वतःसोबत एक खाजगी बॉडीगार्ड घेऊन फिरत होते.