जेएनएन, मुंबई -Potholes on Atal Setu : रायगड, मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाचा आणि देशपातळीवरील चर्चित असेलेला अटल सेतू (Atal Setu) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या नव्याने बांधलेल्या पुलावर खड्डेच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. या आधी या पुलाला तडे गेल्याचे फोटो व व्हिडिओ समोर आले होते. आता पावसाळ्यात खड्डे पडल्याचा प्रकार समोर आला आहे.
पावसात खड्ड्यांमुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पुलाच्या कामाच्या दर्जावर गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. मुंबई आणि नवी मुंबईसाठी महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये अशी त्रुटी असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
कामगारांनी उघड केली माहिती!
पुलाचे काम करणाऱ्या स्थानिक कामगारांनी संपूर्ण पुलाच्या खाली पाण्याचा गळतीचा फॉर्म भरून पातळीवरून पाण्याचे झिरपणे सुरू असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे निर्माण होत असून, या समस्येवर अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
मोदीच्या हस्ते झाले होते उद्घाटन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून, यामध्ये भ्रष्ट राजकारण्यांच्या हस्तक्षेपमुळे खराब गुणवत्ता कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकाकडून केला जात आहे. अल्पावधीतच हा भष्ट्राचार उघडकीस आला आहे. अटल सेतूच्या समस्यांमुळे सरकार व ठेकेदार यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.