जेएनएन, मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी मुंबईतील सिमेंट रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी मुंबई महापालिकेला (BMC) 31 डिसेंबरपर्यंत सर्व जुनी व अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण केली गेली पाहिजेत, स्पष्ट निर्देश दिले.
गैरसोयीबाबत व्यक्त केली चिंता
रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त करताना नार्वेकर यांनी नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान महापालिका आयुक्तांना आदेश दिले आहे. महापालिकेच्या पोर्टलवर प्रत्येक रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती नियमितपणे अद्ययावत करावी, जेणेकरून सामान्य नागरिकांना नेमकी माहिती मिळेल.
पदपथांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश
तसेच, मुंबईतील अनेक ठिकाणी तुटलेले पदपथ नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे लक्षात घेऊन पदपथांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. अपूर्ण कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नववर्षापूर्वी खड्डेमुक्त आणि व्यवस्थित रस्ते मिळतील?
मुंबईत रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न होणे, खड्डे आणि वाहतूक कोंडी हे नेहमीचेच झाले आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर मुंबईकरांना नववर्षापूर्वी खड्डेमुक्त आणि व्यवस्थित रस्त्यांचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.