जेएनएन, मुंबई. Mumbai Satyacha Morcha: मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यानी निवडणूक आयोगाच्या आणि मतदान याद्यांतील घोटाळ्यांविरोधात सत्याचा मोर्चा काढला होता. यामोर्चाचे नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि NCS (SP) चे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते होते.
आझाद मैदानावर झालेल्या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आपली तोफ डागली. तसंच, अमित शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सक्षम नावाच्या अॅपवरून माझ्या नावाने खोट्या नंबरवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज केला गेला होता. व्हेरिफिकेशनसाठी हा अर्ज केला होता. माझ्यासह माझ्या कुटुंबाची चारही नावे मतदार यादीतून वगळण्याचा हा डाव असल्याचा मला संशय आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भरसभेत केला.
उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मुंबईत मागे मी एक शब्द प्रयोग केला होता. तो चांगलाच प्रसिद्ध झाला, असं म्हणत… अॅनाकोंडाला आपल्याला आता कोंडावंच लागेल. नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत, असं ते म्हणाले.
निवडणूक आयोग गप्प बसले
रोज कुठून तरी पुरावे येत आहेत. तरीही राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग गप्प बसले. आपला पक्ष चोरला, नाव चोरलं, निशाणी चोरली माझे वडील चोरी करायचा प्रयत्न झाला आणि ते पण पुरलं नाही म्हणून आता मतचोरी करत आहेत, असा त्यांनी आरोप केला.
SHIVSENA | निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभारा विरोधात सत्याचा मोर्चा | मुंबई - #LIVE https://t.co/IgmlO9x4oR
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 1, 2025
मुख्यमंत्र्यांना आव्हान
उद्धव ठाकरे यांनी भरसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आव्हान दिलं. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षांनी म्हणजे आपण कसा लाभ घेतला याचा पर्दाफाश करेन. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो आहे की, तुम्ही आमचा पर्दाफाश कराच. मुख्यमंत्री जेव्हा असं बोलत आहेत त्याचा अर्थ त्यांनी मतचोरी मान्य केली आहे.
