जेएनएन, मुंबई. BKC to Dharavi Metro: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-3 (अॅक्वालाईन) (Mumbai Metro-3) च्या बीकेसी मेट्रो स्थानक ते आचार्य अत्रे मेट्रो स्थानकापर्यंतच्या टप्पा 2-अ चा सेवारंभ आज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मुंबई मेट्रो 3 एक्वालाईनच्या टप्पा 2 अ' (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)चा सेवा विस्तार होत आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो ने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मुंबई मेट्रो ३ एक्वालाईनच्या टप्पा २ अ' (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)चा सेवा विस्तार होत आहे. https://t.co/YJ5EKLiBlM
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) May 9, 2025
धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या मेट्रो स्थानकांचा या लाईनवर समावेश आहे. आरे कॉलनीतून आता आचार्य अत्रे चौकापर्यंत थेट मेट्रोने प्रवास करता येणार आहे. Mumbai Metro-3 च्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसह प्रवास केला. आता मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. जाणून घेऊया मेट्रो लाईन बद्दल…
मुंबई मेट्रो-3 च्या टप्प्यांबद्दलची माहिती
- पहिला टप्पा: आरे कॉलनी ते वांद्रे-कुर्ला संकुल (BKC)
- Aqua Line चा 12.69 किमीचा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 रोजी लोकांसाठी सुरू करण्यात आला. या टप्प्यात BKC, वांद्रे कॉलनी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) T1, सहार रोड, CSMIA T2, मारोल नाका, अंधेरी, SEEPZ आणि आरे कॉलनी JVLR यांसारखी प्रमुख स्थानके आहेत. यातील आरे कॉलनी JVLR हे एकमेव जमिनीवरील स्टेशन आहे.
- दुसरा टप्पा: BKC ते वरळी
- नुकत्याच पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्यात खालील स्थानकांचा समावेश आहे: धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक.
- तिसरा टप्पा: वरळी ते कफ परेड
- अंतिम टप्पा पूर्ण झाल्यावर, नेहरू विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, CSMT, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड यांसारख्या स्थानकांचा समावेश असेल.
हेही वाचा - High Alert in Mumbai: दिल्ली-मुंबईला हाय अलर्ट, राज्याच्या समुद्री सीमेवर कडक बंदोबस्त!