जेएनएन, मुंबई. High Alert in Delhi-Mumbai: भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानच्या हद्दीतील दहशदवादी संघटनाची तळ जमीनदोस्त केली आहे. त्यानंतर पाकिस्तान बिधरला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव वाढला आहे. याचपार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतसह मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मच्छिमारांना अलर्ट राहण्यांच्या सूचना

राज्याच्या समुद्री सीमेवर कडक बंदोबस्त केला असून मच्छिमारला समुद्रात जाण्याआदी कडक तपासणी केली जात आहे. सोबतच मच्छिमारला अलर्ट राहण्याचे आदेश ही देण्यात आले आहे.

दिल्लीत अतिदक्षतेची स्थिती

दिल्लीत अतिदक्षतेची स्थिती जाहीर करण्यात आली आहे, सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्यसेवा आणि आपत्ती प्रतिसादात आपत्कालीन तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी राजधानीतील जिल्हा अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. 

सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश

    त्याबरोबरोबर मुंबईत ही अलर्ट असून समुद्री सीमेसहित महाराष्ट्र पोलिसला सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. संशयित नागरिकाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

    राज्यात अलर्ट जारी !

    पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावमुळे राज्य पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रात्र पाळीची दक्षता वाढविण्यात आली आहे. पोलिससह इतर ही गुप्त सुरक्षा यंत्रणा सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत असून इतर संशयित ठिकाणी नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.