जेएनएन, नवी मुंबई: मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेतील एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या हार्बर मार्गावरील (Harbour Line) वाशी (Vashi) आणि सानपाडा (Sanpada) सह नवी मुंबईतील एकूण 10 रेल्वे स्थानके लवकरच मध्य रेल्वेकडे (Central Railway - CR) हस्तांतरित होणार आहे. या स्थानकांची मालकी सध्या सिडको (CIDCO - City and Industrial Development Corporation) कडे आहे, परंतु लवकरच ती मध्य रेल्वेकडे सोपवली जाणार आहेत, याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हस्तांतरणाचे मुख्य कारण:- जुन्या इमारती आणि देखभाल दुरुस्तीचा प्रश्न या हस्तांतरणामागचे मुख्य कारण आहे. या स्थानकांमध्ये सिडकोने बांधलेल्या 20-25 वर्षे जुन्या इमारती आणि संरचनांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी मध्य रेल्वे घेण्यास तयार झाले आहे.

सिडकोने मध्य रेल्वेला या स्थानकांची जबाबदारी जशीच्या तशी  स्वीकारण्यास सांगितले आहे. स्थानकांवरील जुन्या इमारतींच्या सध्याच्या स्थितीसह त्यांची जबाबदारी मध्य रेल्वेला घेणार आहे.

नवी मुंबईतील रेल्वे मार्गिका आणि स्थानके सिडकोने विकसित केली आहेत. आतापर्यंत त्यांची देखभाल देखील सिडको करत होता. या इमारती जुन्या झाल्याने त्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकांमध्ये प्रवासी सुविधा, तिकीट खिडक्या आणि इतर कार्यालयीन वापरासाठी या इमारती महत्त्वाच्या आहेत.

यामुळे 10 स्थानकांची संपूर्ण जबाबदारी मध्य रेल्वेकडे सोपवून, सिडकोला या देखभालीच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे.

हस्तांतरित होणाऱ्या स्थानकांची असे आहे नावे:- 

    माहितीनुसार, वाशी आणि सानपाडा या स्थानकांसह नवी मुंबईतील मानखुर्द ते पनवेल पर्यंतच्या भागातील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केले जाणार आहे.  यामध्ये

     * मानखुर्द

     * वाशी

     * सानपाडा

     * नेरूळ

     * सीबीडी बेलापूर

     * खारघर

     * पनवेल

     * ऐरोली

     * रबाळे

     * घणसोली या स्थानकाचा समावेश आहे.