एजन्सी, मुंबई: मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्व्हर लाईनवरील लोकल ट्रेन सेवा शनिवारी सकाळी गर्दीच्या वेळी शिवडी स्थानकावर ओव्हरहेड उपकरणांमध्ये (OHE) कापडाचा एक तुकडा अडकल्याने विस्कळीत झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही काळासाठी गाड्या विस्कळीत
ही घटना शिवडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सकाळी 9.45 च्या सुमारास घडली, ज्यामुळे सीएसएमटीकडे (CSMT) जाणाऱ्या लोकल गाड्या थांबल्या, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, वडाळ्याहून (Wadala) येणाऱ्या सेवा थांबवाव्या लागल्या आणि लटकलेले कापड काढण्यासाठी ओएचईचा (OHE) वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सकाळी 10.13 वाजता सेवा पूर्ववत करण्यात आली.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईशी जोडणाऱ्या हार्व्हर लाईनवरील गाड्या गर्दीच्या वेळी 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.
