जेएनएन, मुंबई. Mumbai AC Local News: मुंबईकर प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या काळात मुंबईची लोकल रेल्वे सेवा संपूर्णपणे एसी (वातानुकूलित) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, लोकलची सेवा फुल एसी झाली तरी प्रवाशांना यासाठी जास्त दर मोजावा लागणार नाही. सध्याचा तिकीट दरच कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांना प्रचंड दिलासा मिळणार आहे. बंद दरवाजाच्या AC लोकलमुळे मुंबईत अपघात कमी होणार असल्याची माहिती विधानसभेत दिली आहे.

 नवीन लोकलच्या डब्याच्या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल, शिवाय उष्णतेपासून दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकल रेल्वे ही मुंबईच्या वाहतुकीची लाइफलाइन मानली जाते. त्यामुळे पूर्णपणे एसी कोचमुळे प्रवासाचा दर्जा वाढणार असून, नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार आहेत. 

केंद्र सरकारचा रेल्वे प्रशासन व राज्य सरकार यांच्यातील समन्वयातून ही योजना लवकरच अमलात आणली जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. प्रवाशांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.