एजन्सी, मुंबई. Mumbai Fire Latest News: नवी मुंबईतील तुर्भे येथील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे घटनास्थळी दोन स्फोट झाले आणि किमान आठ वाहने जळून खाक झाली, त्यापैकी काही गाड्या मालाने भरलेल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नवी मुंबईतील तुर्भे भागात रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, असे त्यांनी सांगितले.
STORY | Fire at truck terminal in Navi Mumbai; 8 vehicles damaged
— Press Trust of India (@PTI_News) July 7, 2025
READ: https://t.co/iZqBMCd70V
VIDEO |
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/2hgTmKauUy
स्फोटामुळे आकाशात आगीचे गोळे आणि दाट काळा धुराचे लोट दिसत होते, असे त्यांनी सांगितले. आग विझविण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
रात्री 11.15 वाजताच्या सुमारास सरकारी मालकीच्या एमएसआरटीसी बस डेपोमध्ये आग लागली, जिथे ट्रक तात्पुरते उभे आहेत. आगीत किमान दोन ते तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे काम अजूनही सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.