जेएनएन, नवी मुंबई: Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत रायगड जिल्ह्यामध्ये थरारक करणारी घटना घडली आहे. कार चालकाची हत्या करून प्रेमी जोडपे पसार झाला होते. उलवे भागात राहणाऱ्या सुरेंद्र आसाराम पांडे चालकाची हत्या केल्यानंतर त्याचीच कार घेऊन प्रेमी जोडपे पसार झाले होते. या हत्या प्रकरणात 19 वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर संगमनेर पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.

प्रेमी जोडप्याला अटक

संगमनेर पोलिस स्टेशनने याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडे याच्या घरात जाऊन पाहणी केल्याची माहिती पोलिसकडून देण्यात आली आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने उलवे पोलिसांनी या हत्या प्रकरणातील तरुणी रिया दिनेश सरकल्याण सिंग आणि तिचा प्रियकर विशाल संजय शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

रियाला सुरेंद्र पांडेंनी घरामध्ये राहायला दिली जागा 

घटनेतील मृत सुरेंद्र पांडे हा मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असून सध्या तो उलवे सेक्टर-24 मधील मोहागाव येथील क्रियांश रेसीडेन्सी इमारतीत एकटाच राहत होता. पांडे ओला कार चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. एक महिन्यापूर्वी सुरेंद्र पांडे याची आरोपी तरुणी रिया सरकल्याणसिंग हिच्यासोबत ओळख झाली होती. मुळचे पंजाब राज्यातील रिया ही नोकरीच्या शोधात असल्याने सुरेंद्र पांडे याने तिला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. रियाला सुरेंद्र पांडे यांनी घरामध्ये राहायला जागा दिली होती.

    असे आहे प्रकरण

    रियाने चार दिवसापूर्वी संगमनेर येथे राहणाऱ्या विशाल शिंदे या प्रियकराला उलवे येथील घरी बोलावून घेतले होते. विशाल सुद्धा रियासोबत सदर घरात राहु लागल्याने 2 एप्रिल रोजी रियाचे आणि सुरेंद्रचे भांडण झाले होते. या भांडणात रिया आणि विशाल या दोघांनी सुरेंद्र पांडे याच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करुन त्याची हत्या केली. दरम्यान, अटकेनंतर त्यांनी सुरेंद्र पांडे हा शरीर सुखाची मागणी करत असल्याचे दोघांनी पोलिसाना सांगितले आहे.