एजन्सी, मुंबई: मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेत 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी मुलीच्या आजीने तिला शाळेत सोडल्यानंतर ही घटना घडली, असे गोरेगाव पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
पोलिस तक्रार दाखल
जेव्हा मुलगी घरी परतली तेव्हा तिने वेदना होत असल्याची तक्रार केली. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, तिच्या कुटुंबाने शाळा प्रशासनाला कळवले आणि पोलिस तक्रार दाखल केली, असे त्यांनी सांगितले.
तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि शाळेतील एका महिला कर्मचाऱ्यांना अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, कथित गुन्हात तिची भूमिका स्पष्ट नव्हती.
तीन महिलांना चौकशीसाठी बोलवलं
तपासाचा भाग म्हणून पोलिस शाळेतील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत होते. शाळेतील तीन महिला सहाय्यक कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.