जेएनएन, मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प रखडू नयेत, वेगाने आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला स्पष्ट आणि कठोर निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता देण्यात आली आहे. 

मेट्रो लाईन 8 बद्दल (Metro Line 8)

  • मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर, 
  • भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, 
  • उन्नत मार्ग 24.636 किमी, 
  • एकूण 20 स्थानके, 
  • 6 स्थानके भूमिगत, 
  • 14 स्थानके उन्नत. 

मेट्रो लाईन 8 प्रकल्प कसा असेल?

  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर पूर्व पर्यंत भूमिगत स्थानके,
  • घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकापर्यंत उन्नत स्थानके,
  • दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर, 
  • 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, 
  • भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. 
  • प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. 

मेट्रो लाईन 8 साठी सहा महिन्यांची मुदत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान प्रस्तावित मेट्रो लाईन क्रमांक 8 बाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. या प्रकल्पासाठी भूसंपादनासह सर्व आवश्यक मंजुरीसह पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच हा मेट्रो प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सर्व परवानग्या, तांत्रिक बाबी आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण असली पाहिजे. नंतर अडथळे येऊन कामे रखडू नयेत.”