जेएनएन, मुंबई. Maharashtra Assembly Session 2025: राज्य सरकारमध्ये मंत्र्यांपासून ते वरिष्ठ अधिकारीपर्यंत हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केला आहे.

नाना पटोले यांनी सरकारला चौकशीची मागणी केली असून या प्रकरणात आज नवीन गौप्यस्पोट करणार आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातून राज्यातील गोपनीय शासकीय कागदपत्रे आणि माहिती राज्याबाहेर लीक होत आहे, यामध्ये काही IAS अधिकारी तसेच मंत्री सहभागी असल्याचा पटोले यांनी दावा केला आहे.

हनीट्रॅपच्या माध्यमातून माहितीची चोरी

हनीट्रॅप ही एक सुव्यवस्थित रचलेली योजना आहे. हनीट्रॅपमध्ये सरकारी अधिकारी व मंत्र्यांना अडकवून त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्रं, गोपनीय माहिती, शासकीय धोरणं यांची माहिती मिळवली जाते. ही माहिती राज्याबाहेर पोहोचविल्याचा संशय पटोले यांनी विधानसभेत व्यक्त केला आहे.

विरोधकांच्या आरोपांनी खळबळ उडाली

नाना पटोलेच्या आरोपांमुळे विधानसभेत आणि संपूर्ण शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. नागपूर ते नाशिकपर्यंत सरकारच्या विविध विभागांत या हनीट्रॅप टोळीची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. काही ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांचे व्हिडीओ, फोटो, चॅट अशा स्वरूपात ब्लॅकमेलिंग केल्याची माहिती समोर येत आहे.

    चौकशीची मागणी, सरकार शांत

    नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अध्यक्षांनीही या आरोपांतील तथ्य तपासण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. मात्र सरकारकडून कुठलेही पाऊले उचलले नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की ही माहिती गृहविभागाकडे पाठवली जाईल आणि पोलीस यंत्रणा चौकशी करेल.

    गुन्हेगारी टोळी सक्रिय? सरकारी माहितीच्या बदल्यात पैसे

    हनीट्रॅप प्रकरणात एक गुन्हेगारी टोळी कार्यरत आहे  असा दावा पटोले यांनी केला आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातून सरकारी कंत्राटं व पैशांची मागणी करण्यासाठी ही माहिती वापरण्यात येत आहे असा दावा पटोले यांनी केला आहे.