जेएनएन, मुंबई. Mumbai News: नैऋत्य मान्सून आज, 26 मे 2025 रोजी मुंबईत दाखल झाला, जो सामान्य प्रगतीच्या तारखेपेक्षा 11 जून होता. अशाप्रकारे, मान्सून नेहमीपेक्षा 16 दिवस आधी मुंबईत दाखल झाला आहे. 2001-2025 या कालावधीत यंदा मुंबईत मान्सून सर्वात आधी दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

पुण्यात 12 दिवस आधी मान्सून दाखल

सामान्य तारखेपेक्षा दोन आठवड्यांपेक्षा जास्त आधी पुणे-मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. पुण्यात सामान्य 10 जूनला मान्सून दाखल होत असतो. मात्र, आज 12 दिवसांआधीच मान्सून पुण्यात दाखल झाला आहे.

मुंबईत रेड अलर्ट

मुंबईत मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. यातच आता काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची वातहुक मंदावली आहे. अनेक लोकल ट्रेनही धिम्मा गतीनं सुरु आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचले आहे. यातच आता आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Red Alert in Mumbai) त्यामुळे येत्या 24 तासांत या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    राज्यात पावसाचा अलर्ट

    अलर्टचा प्रकारजिल्ह्यांची नावे
    रेडठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा, सातारा घाट
    ऑरेंजसिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशीव. 
    येलोपालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ