जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसासाठी आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत रेड अलर्ट Red in Mumbai 

मुंबईत मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. यातच आता काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची वातहुक मंदावली आहे. अनेक लोकल ट्रेनही धिम्मा गतीनं सुरु आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचले आहे. यातच आता आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Red Alert in Mumbai)

लोकलची वाहतूक मंद गतीनं, चाकरमानी त्रस्त

ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना अडचणी येत आहेत कारण ते म्हणतात की पावसामुळे गाड्या मंद गतीने धावत आहेत. एक प्रवासी म्हणला की, "गेल्या तासाभरापासून येथे ट्रेन थांबवण्यात आल्या आहेत. जर पहिल्या मुसळधार पावसानंतर गाड्या रद्द झाल्या तर आपण ऑफिसला कसे पोहोचू? प्रशासनाने रेल्वे वाहतूक सुरळीत करावी."  दुसरा प्रवासी म्हणला की, "मुंबईत इतका पाऊस पडलेला नाही की गाड्या रद्द कराव्या लागतील."

एकनाथ शिंदे यांचे निर्देश

    दरम्यान, संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी, तसेच आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे. पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा यावर विशेष लक्ष ठेवावे. मोडकळीस झालेल्या आणि धोकादायक इमारतीत संदर्भात देखील काळजी घ्यावी, मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू कशी राहील, किंवा जिथे मोठी अडचण येईल तिथे प्रवाशांना त्रास कसा होणार नाही यासाठी सतर्क रहावे असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले.

    राज्यात पावसाचा अलर्ट

    अलर्टचा प्रकारजिल्ह्यांची नावे
    रेडठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा, सातारा घाट
    ऑरेंजसिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशीव. 
    येलोपालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ