जेएनएन, मुंबई: राज्यात जुलै व ऑगस्ट 2025 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 19 लाख 22 हजार 909 शेतकऱ्यांच्या 15 लाख 45 हजार 250.05 हेक्टर वरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 1 हजार 339 कोटी 49 लाख 25 हजाराच्या मदतीस (Maharashtra Govt Subsidy) मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्याला तत्काळ मदत
यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून अडचणीत सापडलेल्या या शेतकऱ्याला तत्काळ मदत करून त्याचे जीवन सुकर करण्यासाठी ही मदत निश्चितच उपयोगी पडेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
कोणत्या विभागाला किती निधी मंजूर
अमरावती विभाग
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील 7 लाख 88 हजार 974 शेतकऱ्यांच्या 6 लाख 54 हजार 595.42 हेक्टर वरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 565 कोटी 60 लाख 30 हजाराच्या मदतीस मान्यता.
नागपूर विभाग
नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील 37 हजार 631 शेतकऱ्यांच्या 21 हजार 224.64 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 23 कोटी 85 लाख 26 हजाराच्या मदतीस मान्यता.
पुणे विभाग
पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 36 हजार 559 शेतकऱ्यांच्या 8 हजार 835.15 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 14 कोटी 28 लाख 52 हजाराच्या मदतीस मान्यता.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजी नगर विभागातील हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील 10 लाख 35 हजार 68 शेतकऱ्यांच्या 8 लाख 48 हजार 445.37 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 721 कोटी 97 लाख 86 हजाराच्या मदतीस मान्यता.
नाशिक विभाग
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 24 हजार 677 शेतकऱ्यांच्या 12 हजार 149.46 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 13 कोटी 77 लाख 31 हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.