जेएनएन, मुंबई: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कर्तव्य बजावताना जीवित व मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्हे रोखणे किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी दाखवलेल्या उल्लेखनीय शौर्याबद्दल शौर्य पदक दिले जाते. यंदा देशभरात ३०१ शौर्य पदके जाहीर झाली असून, त्यात २७२ पोलीस आणि २९ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील ३३ जणांना शौर्य पदक

महाराष्ट्रातील शौर्य पदक मिळालेल्या २० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजू पांडुरंग गवळी, वासुदेव राजम मडावी, नाईक पोलीस शिपाई दिलीप विठ्ठल आत्राम, मसा बोरा अत्राम, दशरथ रामशहा मडावी, पोलीस शिपाई अजय गोपाळराव मडावी, गणेश चंद्रम दुब्बुला, विजय झरू मडावी, भूपेश मारोत्राव जुनमाके, दलसू कटिया बोगामी, राजेश शामराव किरांगे, राकेश राजम बेडकी, सुधाकर जगन पोर्टे, श्रीनिवास समय्या निष्टुरी, गणेश हनमंतु गजीवार, नितेश प्रभुदास टेंबेकर, शिवाजी मेस्सो हिचामी, संजय मल्लेश कंकाबंदवार यांचा समावेश आहे. तसेच यतिश विजयराव देशमुख, भापोसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस हवालदार विजय किश्तय्या कोडपे यांनाही शौर्य पदक जाहीर झाले आहे.

अग्निशमन सेवेतून मनोज विश्वनाथ सावंत, रवींद्र नारायणराव आंबुलेकर, अनिल वसंत परब, ईश्वर खंडू कांबळे, योगेश हिरालाल पवार, दत्तात्रय अशोक भोसले, महेश आनंद गुदलकर, चिंतामणी शिवाजी खांडेकर, विकी नागेश सरवदे, दर्शन घनश्याम पावडे, रमेश जीवन कोळी, राजेश विष्णू राणे आणि हर्षल शंकर कटके यांना शौर्य पदक जाहीर झाले आहे.

९२ राष्ट्रपती पदके विशिष्ट सेवेसाठी

    सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक – विशिष्ट सेवेसाठी (PSM) दिले जाते. यंदा देशभरात ९२ पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये ८३ पोलीस सेवा, ४ अग्निशमन सेवा, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

    महाराष्ट्रातील पोलीस सेवेतून अतिरिक्त पोलीस महासंचालक शिरीष रवींद्र जैन, पोलीस उपअधीक्षक सुभाष नानासाहेब भुजंग आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय राजाराम वायचळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सुधारात्मक सेवेतून सुभेदार संजीव सखाराम घाणेकर आणि हवालदार संजय राजारामजी तलवारे यांचा गौरव करण्यात आला आहे.

    गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६४ पदके

    कौशल्यपूर्ण कार्यपद्धती, कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उल्लेखनीय सेवेसाठी पदक – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) प्रदान केले जाते. देशभरात यंदा ६६४ पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये ६०६ पोलीस सेवा, २८ अग्निशमन सेवा, १८ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा आणि १२ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

    महाराष्ट्रातील ३७ पोलीस कर्मचारी, २ अग्निशमन सेवा कर्मचारी, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.

    पोलीस सेवेत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी गौरविण्यात आलेल्यांमध्ये संजय बाजीराव जाधव, विजयकुमार गोपीनाथ मगर, दिगंबर पांडुरंग प्रधान, प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी, भागीरथ शिवाजी देशमुख, प्रवीण विनायक तेजाळे, मनोजकुमार माधवराव यादव, वैभवकुमार जगदेवराव जाधव, संतोष धनसिंग बर्गे, विश्वजीत वसंत कैगडे, जितेंद्र आनंद कदम, जनार्दन यशवंत देसाई, अंकुश बाबालाल न्यायनिर्गून, विलास हनुमानराव इंगळे, मुजफ्फर अली जाफर अली सय्यद, विनोद प्रभाकर पाटील, दिलीप भीमा धुमणे, मोहन अण्णासाहेब सौदणे, दिपक अनंत ठाकूर, संपत मुरलीधर खैरे, गुलाब प्रभाकर सोनार, शेखर दशरथ फार्टले, शेरखान दिलावरखान पठाण, सुनील निवृत्ती कदम, शैलेश चंद्रकांत उपासनी, प्रकाश बळीराम कदम, चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर, दिनेश विश्वनाथ बडगुजर, अरुण पाट्रुजी आत्राम, शिवानंद महादेव स्वामी, पांडुरंग बाप्पाजी पाटील, अनवरअली सय्यदअली सय्यद, गणेश शंकर शिंदे, मनोज गोपाळराव मांगरूळकर, प्रदीप वसंतराव चौगांवकर, भारत खिमजी गोहिल आणि राजकुमार यादवराव जनबंधू यांचा समावेश आहे.

    अग्निशमन सेवेतून मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर उत्तम मिसाळ आणि अग्निशामक शैलेश महादेव जगताप यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.

    नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतून पोपट रामजी सांगदे, अशोक नामदेव इंगळे आणि मनोज सदाशिव बरसागडे, तर सुधारात्मक सेवेतून विकास हनमंतू राजनळवार आणि महेश लक्ष्मण गडनाईक यांचा गौरव करण्यात आला आहे.

    दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी विविध पदके जाहीर केली जातात. यंदाच्या यादीत महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश झाल्याने राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

    हेही वाचा: चाकणच्या उद्योग स्थलांतरावरून राजकारण तापले; 36 हजार कंपन्यांच्या आकडेवारीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण