जेएनएन, मराठी.Marathi Language Day 2025 Wishes: मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तसेच याच दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांची जयंती देखील साजरी केली जाते. या दिवशी मराठीचे गौरव गाणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र शासानाने 21 जानेवारी 2013 मध्ये या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.

भारत सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश होतो. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेली ही मराठी भाषा आता अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते आहे. हा या भाषेला मिळालेला सन्मानच, मराठी भाषेचा वारसा त्याचे महत्व हे येणाऱ्या पिढीला समजावून सांगणे गरजेचे आहे, जेणेकरून येणारी अनेक वर्षे मराठी भाषा जपली गेली पाहिजे तिचे अस्तित्त्व अबाधित राहिले पाहिजे. म्हणूनच आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुमच्या प्रियजनना या शुभेच्छा संदेशासह तुम्ही मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. वाचा मराठीतील हे शुभेच्छा संदेश.


मराठी मातीत रुजलेली भाषा, मराठी माणसाचा अभिमान! मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!

  • शब्दांची गंगा, भावनांचा सागर, मराठी भाषा गौरव दिन मंगलमय होवो!
  • कुसुमाग्रजांच्या कवितांना अभिवादन! मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • मराठी भाषेचा गौरव करूया, तिच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करूया!

    हेही वाचा: Marathi Language Day 2025:मराठी भाषा गौरव दिनी वाचकप्रेमींसाठी येणार हे 51 नवे ग्रंथ
  • मराठी भाषा आपली ओळख, तिचा सन्मान करूया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
  • मराठी भाषेचा वारसा जपण्याचा संकल्प करूया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
  • मराठी भाषेतील माधुर्य अनुभवूया, मराठी भाषा गौरव दिन साजरा करूया!
  • मराठी भाषा आपली शान, तिचा अभिमान बाळगूया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
  • मराठी भाषेच्या विकासासाठी योगदान देऊया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
  • मराठी भाषा आपली संस्कृती, तिचे जतन करूया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
  • मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठीत बोलूया!
  • मराठी भाषा गौरव दिनी, मराठी माणसांचा गौरव करूया!
  • मराठी भाषा गौरव दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
  • मराठी भाषा गौरव दिनी, मराठी संस्कृती जतन करूया!