जेएनएन, मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला आहे.
आंदोलनकर्त्यांना अन्न, पाणी मिळू दिलं जात नाही. सरकारने मराठ्यांना वेठीस धरू नये. आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, पण सरकारने मूलभूत सुविधा नाकारून दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये असा ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला.
आंदोलकांना आवाहन!स
रकारविरोधी नाराजी व्यक्त करत जरांगे यांनी आपल्या समर्थकांना पुन्हा एकदा शांततेत राहून आंदोलन करण्याचं आवाहन केला आहे. आंदोलनाचं स्वरूप अहिंसकच राहिलं पाहिजे, कारण आमचं ध्येय आरक्षण मिळवणं आहे, गोंधळ घालणं नाही असेही जरांगे म्हणाले.
महापालिकेचा आदेश!
आझाद मैदान परिसरात वाढलेल्या गर्दीमुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने रस्ता रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आंदोलकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.