मुंबई. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CJP च्या आंदोलनाला तुषार गांधी यांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते निघाले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तुषार गांधी यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारवाईबाबत माहिती दिली.
CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, तुषार गांधी यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे ताब्यात घेण्यात आले, याबाबत पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले.
महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेणे हा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे! जंतर-मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदानात जमण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. लोकशाहीत आंदोलनाला पाठिंबा देणे हा गुन्हा आहे का? तुषार गांधी यांना तातडीने मुक्त करा आणि शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवा! #TusharGandhi #लोकशाही #अभिव्यक्तीस्वातंत्र्य #MumbaiPolice
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) October 10, 2026
CJP च्या कायदेशीर पथकाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनाही ताब्यात घेतले
दरम्यान, CJP च्या कायदेशीर पथकाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तीन वकिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान 25 हून अधिक जणांना पोलिसांच्या एका वाहनात बसवून ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
रत्ना सिंह आणि त्यांच्यासोबत असलेल्या वकिलांना ताब्यात घेण्यामागील कारण पोलिसांनी स्पष्ट केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसह कायदेशीर पथकातील सदस्यांवर झालेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
आंदोलनापूर्वीच पोलिसांची कारवाई
CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुषार गांधी, रत्ना सिंह आणि अन्य व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याने आंदोलनाचे पुढील स्वरूप काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तींना ताब्यात घेण्याचे अधिकृत कारण, त्यांच्यावरील पुढील कारवाई आणि त्यांना सोडण्यात आले आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
