जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Latest News: गेल्या दोन दिवसापासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. भर उन्हाळ्यात आकाशात दाटून आले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता

विदर्भात गारपीठ पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. केंद्रीय हवामान विभागाने देशभरातील हवामानाचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. पुढील 24 तासांमध्ये देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांसह पश्चिम बंगालमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे.

अचानक तापमानामध्ये घट 

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये उन्हाची लाट कायम असतानाच विदर्भ आणि नजीकच्या भागांमध्ये अचानक तापमानामध्ये घट झाली आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पूर्व विदर्भात पुढील 24 तासांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

    कमी दाबाचा पट्टा तयार

    राज्यात वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. पुढील काही तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, त्याच पश्चिम विदर्भ आणि कर्नाटक ते केरळदरम्यानच्या कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे.