जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रात मुळसधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या काही दिवसांत पावसाची अशीच कोसळधार सुरु राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आजही अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत ऑरेंज अलर्ट

IMD कडून मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरीची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. अधूनमधून ताशी 60 ते 70 कमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुण्यात येलो आणि रेड अलर्ट (Pune Weather Update)

पुण्यात हवामान विभागाने शहरात यलो आणि घाट परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यानिहाय पावसाचा अलर्ट

    • रेड अलर्ट - पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, 
    • ऑरेंज अलर्ट - ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाट, अकोला, अमरावती, 
    • येलो अलर्ट - सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे,  कोल्हापूर घाट, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ,

    हेही वाचा - Mumbai Rain Alert: मुंबईत पुढील 3 दिवसांत 300 मिमी पावसाचा इशारा; प्रचंड वेगाने वारे, आज BMC ची विशेष महासभा