जेएनएन, मुंबई. राज्यात पावसाने हाहाकार उडावला होता. यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, रायगड, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर मालाड पश्चिम सारख्या भागात सतत पाऊस पडत आहे. प्रवाशांना संथ वाहतुकीचा सामना करावा लागला, तर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचले आहे. ज्यामुळे सततच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.
उकाड्यापासून दिलासा
शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिकांची काढणी सुरु असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आता आज पुन्हा मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra: Rain lashes parts of Mumbai
— IANS (@ians_india) October 26, 2025
(Visuals from Marine Drive) pic.twitter.com/ip5B8uLRpV
या जिल्ह्यात येलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज!
- मराठवाडातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांत विजांसह जोरदार पाऊस.
- पश्चिम महाराष्ट्रतील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर परिसरात हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज.
- विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस.
शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा!
हवामान खात्याने शेतकऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत.
- शेतमाल काढणीसाठी पुढील 2–3 दिवस प्रतीक्षा करावी.
- साठवलेले धान, सोयाबीन, कापूस किंवा हरभरा पिके पावसापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
- खुल्या शेतांतील तणनाशके किंवा कीटकनाशकांचा वापर पुढील काही दिवस टाळावा.
हेही वाचा - मोंथा चक्रीवादळाचा रेड अलर्ट: या राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
