जेएनएन, पुणे: पावसाळ्यात पर्यटनसाठी गेलेल्या पर्यटकसाठी पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल घातक ठरला . इंद्रायणी पूल अचानक कोसळलयाने या दुर्घटनेत 5  पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांत एका लहान मुलाचाही समावेश आहे.इंद्रायणी दुर्घटनेतून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त पर्यटकांना वाचविण्यात आले असल्याची माहिती पुणे प्रशासन विभागाने दिली आहे.

रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यावेळी पुलावर 100 हून अधिक पर्यटक असल्याची माहिती समोर  आली आहे.बचावकार्य आजही सुरू असून सकाळपासून जोरदार पाऊस पडत असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत आहे. 

सर्व जुन्या पुलांचे स्त्रचरल ऑडिट केले जाणार!
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या घटनेची चौकशी केली जाणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. 

राज्य सरकारकडून 5 लाखाची मदत जाहीर!
इंद्रायणी पूल दुर्घटनामध्ये 5 पर्यटकांचा मृत्यू झाला असून राज्य सरकार कडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये राज्य सरकारकडून हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

पंतप्रधानकडून मुख्यमंत्री यांना फोन !
पूल दुर्घटनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून माहिती विचारली. पंतप्रधान यांनी पर्यटकबाबत माहिती विचारून केंद्र सरकारकडून सर्व मदत करण्याचे आश्वसन दिले.सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्याचे मोदी यांनी फडणवीस यांना सांगितले.