जेएनएन, मुंबई. Maharashtra Rains: राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात अद्यापही पावसाने दडी दिली असली तरी राज्यातील काही ठिकाणी मात्र कह केला आहे. पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहेत. नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत.
या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने वाशिम, अमरावती, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे आणि सातारा घाट या परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, नागपूर, भंडारा, गोंदिया व नाशिक या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने वाशिम, अमरावती, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे आणि सातारा घाट या परिसराला पावसाचा 🟠 ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, नागपूर, भंडारा, गोंदिया व नाशिक या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य… pic.twitter.com/CgdqDcbSJg
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 8, 2025
पूर्व विदर्भात तुफान पाऊस
गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांनी आवागमन करताना काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
विदर्भात आज सकाळी साडे आठपर्यंत नोंदवलेले पावसाचे आकडे खालीलप्रमाणे -
सर्वाधिक पाऊस:
- अकोला: 21.7 मिमी, मुर्तिजापूर येथे
- अमरावती: 52.7 मिमी, तिवसा येथे7
- भंडारा: 153.8 मिमी, लाखांदूर येथे
- बुलढाणा: 28.5 मिमी, मेहकर येथे
- चंद्रपूर: 208.6 मिमी, ब्रह्मपुरी आयएमडी येथे
- गोंदिया: 226.5 मिमी, देवरी येथे
- नागपूर: 118.6 मिमी, भिवापूर येथे
- वाशिम: 10.8 मिमी, वाशिम आयएमडी येथे
- यवतमाळ: 29.0 मिमी, बाभूळगाव येथे
- गडचिरोली: 169.6 मिमी, देसाईगंज येथे
- वर्धा: 57.6 मिमी, आर्वी येथे
हेही वाचा - Maharashtra Rains Update: सर्वदूर ढगफुटी सदृश पाऊस, गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, अनेक रस्ते बंद