जेएनएन, मुंबई Maharashtra Rains. राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यातच आता आजही हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी (Weather update today) केला आहे. मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्टही दिला आहे.
या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ.
हेही वाचा - Maharashtra Govt Subsidy: अतिवृष्टीचे अनुदान पॅकेज जाहीर, तुमच्या विभागाला किती मिळाला निधी? वाचा सविस्तर…
धाराशीवमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
धाराशीव मध्ये मागील काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. यातच आजही पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू
20 सप्टेंबरपासून आठ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये लातूरमध्ये तीन, बीडमध्ये दोन आणि छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी एकाचा वीज कोसळून, बुडून आणि इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रस्त्याचे आणि दोन शाळांचे नुकसान झाले, तर जालना आणि बीडमध्ये तीन पूल बाधित झाले. मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे पाच लहान धरणांचेही नुकसान झाले.