जेएनएन, मुंबई. Maharashtra Vidhan Bhavan Clash Incident: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्तामध्ये विधानभवनात हाणामारी झाली होती.
राजकीय कार्यकर्त्यांना बंदी घालण्याचे निर्देश
गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनच्या लॉबीतच मारहाण केली. या प्रकरणामुळे विधानभवन सुरक्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विधानभवन परिसरात राजकीय कार्यकर्ता प्रवेशची बंदी घातली आहे. सुरक्षाच्या कारणांमुळे राजकीय कार्यकर्त्यांना बंदी घालण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.
असे आहे प्रकरण !
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी झाली आहे. विधानभवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडले. जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांनी ही मारहाण केली आहे.
काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये विधान भवनमध्ये वाद झाला होता. याआदीचा वाद हा एकमेकांना शिवागाळ करण्याचा होता. मात्र, काल विधानभवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याने सुरक्षाचा प्रश्न निर्माण झाला. विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचे आरोप ही अनेक आमदारांनी केला आहे.