जेएनएन, मुंबई. Weather Update Today: राज्यात जोरदार मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुसळधार पावसाला पोषक वातावरण

मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

काही तासात पावसाचा जोर वाढणार

राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केले आहे. सध्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हात सतत पाऊस सुरू आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

या जिल्ह्यांत अलर्ट

    उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट जारी केला आहे.  

    वाशिम जिल्ह्यात 13 तासांपासून पाऊस सुरूच!

    वाशिम जिल्ह्यात गेल्या 13 तासांपासून संततधार पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसा पासून दडी मारून बसलेल्या पावसाने काल संध्याकाळ पासून जोरदार आगमन केला आहे.