जागरण प्रतिनिधी, रुद्रप्रयाग. उत्तराखंडमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील अलकनंदा नदीत प्रवाशांनी भरलेली बस वाहून गेली आहे. 11 हून अधिक प्रवासी बेपत्ता आहेत. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना घोलथिरमध्ये घडली. 

पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद भरणे यांनी एएनआयला सांगितले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलथिर भागात एक बस अनियंत्रित होऊन अलकनंदा नदीत पडली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 18 जण होते.

रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलथिर येथे 18 प्रवाशी असलेली बस अलकनंदा नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू, सात जखमी झाले आहेत, अशी माहिती एसडीआरएफच्या वतीने देण्यात आली आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या पथकांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले, असेही ते म्हणाले.

'बद्रीनाथ यह क्या किया!'

बद्रीनाथ धाम भागात रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलथिर इथं बस अलकनंदा नदीत कोसळली आहे. यावेळी बसमध्ये असलेल्या आपल्या आप्तजणांच्या विरहाने काही प्रवाशी हे रस्त्यावर टाहो फोडताना दिसले. यावेळी 'बद्रीनाथ यह क्या किया!' असे शब्द त्या पीडित महिलेच्या तोंडावर होते.

हेही वाचा - CBSE Class 10 Board Exams: सीबीएससी बोर्डाचा मोठा निर्णय, 2026 पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा…

    ही बस टेम्पो ट्रॅव्हलर्सची असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रवासी बद्रीनाथला भेट देण्यासाठी जात होते. बसमध्ये एकूण 19 जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी 7 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. सहा जखमी प्रवाशांना वाचवून जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी 7:40 वाजता घडली.