जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या पहाटे पाचच्या सुमारास मुंबईत दाखल झाल्या. त्या आपल्या दोन्ही मुलांसह मुंबईतील त्यांच्या निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर पोहोचल्या आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रफुल पटेल, तटकरेंनी घेतली भेट
यातच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शनिवारी सुनेत्रा पवार यांची त्यांचे दिवंगत पती अजित पवार यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.
छगन भुजबळ देवगिरी बंगल्यावर दाखल
मंत्री पोहोचले असून, ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत.
Mumbai, Maharashtra: Minister Chhagan Bhujbal arrives at the Devgiri bungalow and will meet Sunetra Pawar, wife of late Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/A5AIS03HSH
— IANS (@ians_india) January 31, 2026
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांचे या आठवड्याच्या सुरुवातीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात इतर चार जणांसह निधन झाले.
विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी 2 वाजता विधानभवन कार्यालयात होणार आहे, त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची अपेक्षा आहे.
