जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत काँग्रेस पक्ष (Congress) आज महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक आज टिळक भवन येथे पार पडणार आहे. या बैठकीत मनसेला सोबत घेण्याबाबत गंभीर चर्चा करणार आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते, प्रमुख पदाधिकारी आणि कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धोरण आणि संभाव्य युतीवर चर्चा करणार आहे.बैठकीत
मनसेला सोबत घेण्याबाबत मतभेद होण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्यातील वाढत्या भेटीगाठींमुळे मनसे मविआत सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेसमध्ये मनसेच्या समावेशाबद्दल मतभेद असल्याची माहिती आहे.यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला मविआत घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. "काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या मित्रपक्षाची गरज नाही," अशी भूमिका मांडली होती.
स्थानिक आघाडीचे संकेत: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाण्यासारख्या काही ठिकाणी मविआ आणि मनसेच्या एकत्र लढण्याची राजकीय चर्चा स्थानिक नेत्यांनी केली आहे. यामुळे मनसेसोबत आघाडीचे संकेत मिळत आहे.