जेएनएन, मुंबई: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिवस पुणे येथे साजरा केला जात आहे. दोन्ही पक्ष एकत्र येणार यावर आज शरद पवार आणि अजित पवारकडून मोठे भाष्य केले जाऊ शकते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याबाबतचा निर्णय आज शरद पवार वर्धापन दिनी घेऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्ताच्या मनातील निर्णय शरद पवार घेणार असल्याची चर्चा सदया राजकीय वर्तुळात सुरू आहे.तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक विधान केले आहे. वर्धापन दिनी शरद पवार कार्यकर्ता यांच्याशी चर्चा करून कार्यकर्ताच्या मनातील निर्णय घेतील असे विधान सुळे यांनी केले आहे.

 यामुळे शरद पवार गटाच्या वर्धापन दिनकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. शरद पवार वर्धापन दिनी नेमकी कोणती भूमिका मांडतात याकडे पक्षाच्या कार्यकर्ताचा लक्ष लागला आहे.