नवी दिल्ली. Delimitation Bill, NCP Sharad Pawar: शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष परिसीमन बिलाला म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देईल. याची घोषणा पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा देण्याची गोष्ट म्हटली आहे. न्यूज एजन्सी IANS च्या मते जितेंद्र आव्हाड शरद पवार यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांच्या भेटीनंतर त्यांनी परिसीमन बिलाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन बिलाबाबत शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेत म्हटले होते की, मतदारसंघ पुनर्रचना गरजेची असते. डिलिमिटेशन हे घटनात्मक आहे ते करावं लागतं त्याला काही पर्याय नसतो, असे मला पवार साहेब म्हणाले होते असे आव्हाड यांनी सांगितले. आव्हाड म्हणाले की, पवारसाहेब माझे दैवत आहेत, साहेबांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले. आठ खासदारांना घेऊन सुप्रिया सुळेंनी घेतलेला निर्णय अंतिम असेल असंही आव्हाड म्हणाले. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय झाल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: On his discussion with Sharad Pawar, NCP-SCP leader Jitendra Awhad says, "The discussion wasn't about our party's official stance. The general point being made was that the delimitation process is a constitutional requirement... A decision has been made to support the delimitation process, and we will indeed support it. We will support the delimitation."
— ANI (@ANI) November 27, 2026
न्यूज एजन्सी ANI च्या मते मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर, जिथे शरद पवार दाखल आहेत, आव्हाड म्हणाले, 'ही चर्चा आमच्या पक्षाच्या अधिकृत भूमिकेबद्दल नव्हती. मुख्य गोष्ट ही होती की परिसीमन (डिलिमिटेशन) ची प्रक्रिया एक घटनात्मक आवश्यकता आहे. परिसीमन प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, आणि आम्ही निश्चितच याला पाठिंबा देऊ. आम्ही परिसीमनाला पाठिंबा देऊ.'
दरम्यान एक दिवस आधी NCP (SP) च्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी म्हटले की त्या शनिवारी होणाऱ्या 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या बैठकीत सामील होऊ शकणार नाहीत. या बैठकीत संसद अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. सुप्रिया सुळे यांनी सामील न होण्याचे कारण त्यांचे वडील शरद पवार यांची खराब प्रकृती सांगितले होते. दरम्यान, NCP (SP) ने शुक्रवारी एक व्हिप जारी करून आपल्या लोकसभा खासदारांना 30 नोव्हेंबरपासून सभागृहात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
