जेएनएन, मुंबई. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. लोकभवनात आज सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कराड येथील आजची प्रचार सभा रद्द करत एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शनिवारी सुनेत्रा पवार यांची त्यांचे दिवंगत पती अजित पवार यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

मंत्री छगन भुजबळ देवगिरी बंगल्यावर पोहोचले असून, ते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत.

    एनसीपी आमदार चेतन तुपे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले.